डॉ. सपना मिश्रा, संत कल्पवृक्ष गिरिजी महाराज यांच्या भगिनी

प्रयागराज, २८ जानेवारी (वार्ता.) – कुंभक्षेत्री असलेल्या सनातन संस्थेच्या प्रदर्शनकक्षावर आल्यानंतर मला लक्षात आले की, सनातनने पालघर हत्याकांडाच्या संदर्भात फलक प्रदर्शन बनवून त्याविषयी जागृती करण्याचे कार्य हाती घेतले आहे. त्याच समवेत सनातन संस्थेकडून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे कार्य मागील २५ वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. हिंदु आचारसंहिता, हिंदुत्व यांच्याप्रती ही संस्था पूर्ण रूपाने समर्पित आहे, हे पाहून मनाला आनंद झाला. सनातन धर्माविषयी कार्य करणारी सनातन संस्था एक योद्धा आहे, असे मत डॉ. सपना मिश्रा यांनी व्यक्त केले. सनातन संस्थेने सेक्टर क्रमांक ९ येथे लावलेल्या प्रदर्शनकक्षाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी त्यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले.
संत कल्पवृक्ष गिरिजी महाराज कोण होते ?वर्ष २०२० मध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये हिंसक जमावाने ३ संतांची हत्या केली होती. त्यांमध्ये संत कल्पवृक्ष गिरिजी महाराज यांचाही समावेश होता. |
संत कल्पवृक्ष गिरिजी महाराज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पालघर येथे स्मारक उभारावे !डॉ. सपना मिश्रा पुढे म्हणाल्या की, १६ एप्रिल २०२० या दिवशी पालघर येथे संत कल्पवृक्ष गिरिजी महाराज यांची क्रूरतेने हत्या झाली. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याविषयी मी त्यांचे आभार मानते. भारतातील सर्व साधू-संत, महाराष्ट्र सरकार यांना मी विनंती करते की, संत कल्पवृक्ष गिरिजी महाराज यांना न्याय मिळवून द्यावा, तसेच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांचे स्मारक पालघर येथे बांधावे आणि हत्याकांडात मारले गेलेल्या वाहनचालकाच्या कुटुंबाचे संपूर्ण दायित्व महाराष्ट्र सरकारने घ्यावे. |