विजयदुर्ग किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यांसाठी स्थानिक ग्रामस्थांची निदर्शने

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अविनाश गोखले, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, विजयदुर्ग गावचे सरपंच प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी किल्ला संवर्धनाविषयीच्या मागण्यांचे फलक हाती घेतले होते.

ट्विटरद्वारे विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेस उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग किल्ला ! दुर्दैवाने आज या किल्ल्याची स्थिती दयनीय झाली आहे. विजयदुर्ग किल्ल्याचे जतन, दुरुस्ती आणि संवर्धन होणे आवश्यक असून त्यासाठी सरकारच्या पुरातत्व विभागाने आवश्यक ती पावले उचलावीत

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी त्वरित आदेश देण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

विशाळगडावर मद्याच्या बाटल्यांचा ढिग आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा

इतका कचरा गोळा होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग पांढरा हत्ती बनला असून तो गडकोटांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी हे कार्य गडकोटप्रेमी आणि शिवभक्तांना करावे लागत आहे, हे पुरातत्व खात्यासाठी लज्जास्पद !

छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा आणि हिंदवी स्वराज्याचा प्रमुख जलदुर्ग असणार्‍या विजयदुर्ग किल्ल्याकडे होणारे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

शिवरायांनी बांधलेल्या आणि जिंकून घेतलेल्या गडांवर हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज उभारण्यास प्रशासनाकडून होणारा अटकाव, यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्दैव ते कोणते ?

‘विजयदुर्ग’ किल्ल्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी २९ डिसेंबरला ‘महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन’ करणार ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्मरक्षणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या धर्मक्रांतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची झालेली दुरवस्था जिथे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला लक्षात येते, तिथे सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाला का लक्षात येत नाही ?

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेण येथील धर्मप्रेमींकडून सांकशी गडाची स्वच्छता !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत किल्ले श्री सांकशी गडावरील पाण्याची टाकी, तसेच गडाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली. १८ युवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

किल्ले वंदनगडाचे नाव कधीही पालटणार नाही ! – वनपरिक्षेत्र अधिकारी, वाई, सातारा

‘किल्ले वंदनगड’चे ‘पीर किल्ले वंदनगड’ करण्याचा धर्मांधांचा डाव फसला !

ग्रामपंचायतीने वीजदेयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे किल्ले सदाशिव गडावरील सदाशिव मंदिर अंधारात !

शिवभक्तांना अशी मागणी का करावी लागते ? ग्रामपंचायतीने शिवभक्तांची अडचण लक्षात घेऊन वीजदेयक लवकरात लवकर भरावे, ही अपेक्षा !

शाळा आणि महाविद्यालये येथे जाऊन गड-किल्ल्यांची माहिती द्यावी ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

युवासेनेच्या वतीने आयोजित केलेली गड-किल्ल्यांची स्पर्धा यापुढेही अखंडित ठेवावी. विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय येथे जाऊन गड-किल्ल्यांची माहिती द्यावी, असे आवाहन शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केले.