श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पेण येथील धर्मप्रेमींकडून सांकशी गडाची स्वच्छता !

गडाची स्वच्छता करतांना युवक

पेण (जिल्हा रायगड), २४ डिसेंबर (वार्ता.) – येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी गडसंवर्धन मोहिमेअंतर्गत किल्ले श्री सांकशी गडावरील पाण्याची टाकी, तसेच गडाच्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता केली. १८ युवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. प्रतीमास गडाची स्वच्छता करण्याचे युवकांनी ठरवले आहे. (गडसंवर्धनासाठी प्रयत्न करणार्‍या दुर्गप्रेमींचे कौतुक करावे तेवढे थोडेच ! असे दुर्गप्रेमी सर्वत्र हवेत ! – संपादक)