राज्यातील गडदुर्ग, प्राचीन वास्तू, लेणी, शिलालेख यांचे खासगी संस्थांना संवर्धन करता येणार !

यापुढे प्राचीन स्मारके पहाण्यासाठी द्यावे लागणार शुल्क !

सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणीच्या कामाला वेग

राज्यशासन आणि नौदल यांनी निश्चित केलेल्या भूमीवर पुतळा उभारणी अन् सुशोभीकरण यांचे काम चालू ! या अनुषंगाने नौसेनेचे वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ व्हॉईस ॲडमिरल संजय भल्ला यांनी राजकोट किल्ल्याची पहाणी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथील ‘राजकोट’ किल्ल्यावर उभारण्यात येणार !

सिंधुदुर्ग किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी मालवण किनारपट्टीवर पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे किल्ले बांधण्यात आले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ आणि काहीसा उंच भाग आहे. या जागी ‘राजकोट’ किल्ला बांधण्यात आला होता.

राज्यात १ आणि २ ऑक्टोबरला परिसर अन् गड-दुर्ग स्वच्छता अभियान ! – मंत्री मंगल प्रभात लोढा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्याद्वारे १ ऑक्टोबर या दिवशी नजीकचा परिसर स्वच्छता आणि २ ऑक्टोबर या दिवशी राज्यातील गड-दुर्गांची स्वच्छता अभियान राबवण्यात येणार

विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी योग्‍य ती कार्यवाही करा !

विशाळगड येथे झालेल्‍या अनधिकृत बांधकामांविषयी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांच्‍या पुढाकाराने ‘विशाळगड मुक्‍ती आंदोलना’च्‍या वतीने जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन देण्‍यात आले होते.

शिवकालीन किल्‍ल्‍यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवा ! – रमेश बैस, राज्‍यपाल

महाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीचे रक्षण करण्‍यासाठीच या किल्‍ल्‍यांची निर्मिती झाली आहे. त्‍यामुळे येणार्‍या पिढीला गड-दुर्ग प्रेरणा देतील. त्‍यामुळे या किल्‍ल्‍यांचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोचवायला हवा; जेणेकरून त्‍यांच्‍यामध्‍ये स्‍वाभिमानाची भावना निर्माण होईल, असे आवाहन राज्‍यपाल रमेश बैस यांनी केले.

सरसगडावर ‘राजे फाऊंडेशन’ संस्‍थेकडून गड संवर्धन आणि वृक्षारोपण मोहीम !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या संस्‍कारांचा सगळीकडे प्रसार व्‍हावा, या हेतूने लालबाग येथील ‘राजे फाऊंडेशन’ (महाराष्‍ट्र राज्‍य) ही संस्‍था गेल्‍या दशकापासून मुंबई, तसेच महाराष्‍ट्रात कार्यरत आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण तात्‍काळ जमीनदोस्‍त करा ! – नितीनराजे शिंदे, विशाळगडमुक्‍ती आंदोलन

गड-किल्‍ल्‍यांवर झालेल्‍या अतिक्रमणावर प्रशासन स्‍वतःहून कारवाई कधी करणार ?

विशाळगडावरील शेवटचे अतिक्रमण दूर होईपर्यंत हिंदुत्‍वनिष्‍ठ शांत बसणार नाहीत ! – नितीनराजे शिंदे, विशाळगडमुक्‍ती आंदोलन

विशाळगडावर मद्य-मांस बंदीच्‍या संदर्भातील आदेश यापूर्वीच निघाले असून ते आदेश कोणत्‍याही परिस्‍थितीत मागे घेण्‍यात येणार नाहीत, असे आश्‍वासन जिल्‍हाधिकार्‍यांनी शिष्‍टमंडळास दिले आहेत.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणारा नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य व्हावा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र

आतापर्यंत नौसेना दिवस नवी देहली आणि मुंबई येथे साजरा होत असे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.