क्रियायोग
भगवंताची चव स्वयमेव असल्याकारणाने त्याला लौकिक कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. त्याचा पूर्ण परिचय झाल्यावर जग बेचव होते आणि भगवंत गोड होतो.
भगवंताची चव स्वयमेव असल्याकारणाने त्याला लौकिक कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. त्याचा पूर्ण परिचय झाल्यावर जग बेचव होते आणि भगवंत गोड होतो.
साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे. त्याचे कल्याण झाल्याखेरीज रहाणार नाही.
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत.त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
‘व्यक्तीवर पंचतत्त्वांपैकी वायुतत्त्वाद्वारे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होतात.
प्रत्येक माणसाने आपल्या प्रपंचापासून परमार्थ करायला शिकले पाहिजे. हेच आपल्या जीविताचे सार आहे. अनन्यतेखेरीज भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ती जन्म पावते.
ईश्वर हा मानवाचा शोध आहे. माणसाने ईश्वर निर्माण केला नाही. ईश्वराचे अस्तित्व माणसाने शोधून काढले. कोलंबस याने अमेरिका खंड निर्माण केला नाही, तर शोधून काढला.
सद्गुरु हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धोका उरणार नाही !
एका जन्मातील आठवणी आणि त्याचे रागद्वेष सांभाळता सांभाळता माणसाचा जीव हैराण होतो, तर जन्मजन्मांतरीच्या आठवणी अन् त्या संदर्भातील रागद्वेषाचा बोजा सांभाळणे किती कठीण होईल !
देहाने प्रपंच केला; पण तो फळाला येत नाही; म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला; पण आमचे शहाणपण आणि आमचा अभिमान हा नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावे ?