नाम हा माझा प्राण आहे !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

एक मुलगा श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना) म्हणाला, ‘महाराज इतर देव मला आवडत नाहीत. आपणच मला देव आहात आणि आपण मला भेटला, मग नाम कशाला घ्यायचे ?’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘तुझे म्हणणे खरे आहे; पण मी तुला जिवंत पाहिजे ना ? नाम हा माझा प्राण आहे; म्हणून तू नाम घेत जा.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)