जप करता करता ध्यान करा !

भगवंत किंवा सद्गुरूंच्या चित्राकडे एकटक पहा. त्यांच्या श्रीचरणांपासून गुडघ्यांपर्यंत, गुडघ्यांपासून नाभीपर्यंत, नाभीपासून वक्षस्थळापर्यंत आणि हळूहळू अभ्यास वाढवून त्यांचे मुखमंडल किंवा नेत्र जेथेही तुमचे चित्त लागते तेथे ५-१० मिनिटे एकटक पहा. मग डोळे बंद करून त्या रूपाला आपल्या भ्रूमध्यात जेथे टिळा लावतात, तेथे पहा. याच्याने सहाव्या केंद्राचा (आज्ञाचक्र) विकास होतो. ध्यान-जपाचा नियम पूर्ण झाला की, मग १० मिनिटे असेच शांत बसून रहा ! मनात एखादा विचार आला, तर त्याला महत्त्व देऊ नका ! जपाचा जो भाव, जपाची जी धारा, जे स्पंदन बनले त्यांना अचेतन मनात खोल उतरू द्या, याच्याने पुष्कळ लाभ होईल.

(साभार : मासिक ‘ऋषीप्रसाद’, जुलै २०२२)