‘आमच्या घरी आलेल्या एका संन्याशाला (ते स्वतःला जगातील सर्वांत शहाणा मनुष्य समजत होते.) मी म्हटले, ‘‘रावणाने सीतेला पळवून नेल्यावर राम झाडांना मिठ्या मारून रडू लागला. ज्याला आपण पूर्णावतार मानतो, ‘त्या रामाला ज्ञान नव्हते’, असे आपल्याला म्हणायचे आहे का ?’’ त्यावर ते संन्यासी मला म्हणाले, ‘‘अहो ! राम खरा ज्ञानी नव्हता. ‘जग मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे’, हे त्याला कळले असते, तर सीतेला रावणाने पळवून नेल्यावर तो गप्प बसला असता. त्याला खरे ज्ञान नव्हते; म्हणूनच पुढचे रामायण झाले.’’
– न्या. राम केशव रानडे (साभार : मासिक ‘प्रसाद’, ऑगस्ट १९६५)