‘गण गण गणात बोते’ याचा अर्थ

आज ‘श्री गजानन महाराज प्रकटदिन’ आहे. त्या निमित्ताने….

श्री गजानन महाराज

भजन मंत्राचा अर्थ या प्रकारे आहे – गण म्‍हणजे विचार करणे किंवा लक्षात घेणे. गण म्‍हणजे जीवात्‍मा. गणांत म्‍हणजे ब्रह्माहून वेगळा नसलेला, अर्थात् जीव हाच ब्रह्म आहे. बोते म्‍हणजे जयजयकार करा. याचा अर्थ ‘जीवात्‍मा ब्रह्माहून वेगळा नसून त्‍याचे चिंतन करा’, म्‍हणजेच ‘गण गण गणात बोते’, याचा अर्थ ‘जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत अन् त्‍यांना निराळे समजू नये.’