स्वर्गलोक आणि इहलोक

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. ‘तुम्हाला स्वर्गात काही चिंता नाही, तिथे काही पाण्याची चिंता नाही, रहाण्याची चिंता नाही. सगळ्या म्हणाल त्या गोष्टी; कारण तेथे कल्पवृक्ष आहेत. ही सगळी सुखे तिथे आहेत; पण तिथे स्पर्धा आहे, मत्सर आहेच. तेथे स्पर्धा करावी लागते ती आपल्यापेक्षा पुण्यवान माणसाशी.

२. खालच्या माणसाकडे बघून जरा बरे वाटते आणि वरच्यांकडे बघितले की, मत्सर वाटतो. ‘हा माझ्यापेक्षा मोठा कसा झाला’, या विचाराने त्याला शांती मिळत नाही. हे स्वर्गामध्येही आहे.

३. इहलोकात पुण्य संपादन केल्यानंतर भोग उपभोगण्यासाठी तुम्हाला स्वर्ग मिळेल. तेथे तारुण्य आहे, स्त्रिया आहेत, अप्सरा आहेत, सगळे सगळे आहे. तुमच्या पुण्याप्रमाणे ते भोग तुम्हाला भोगायला मिळतील. सगळीकडे अमृत आहे. नंदनवन आहे, बाग आहे. शरिराच्या दृष्टीने, इंद्रियांच्या दृष्टीने, जी जी सुखे आहेत, त्या सुखाचा परमावधी त्या स्वर्गात आहे.

४. स्‍वर्गात सुख आहे. सुख आहे, म्हणजे इंद्रिय सुख आहे. तिथे मृत्यू नाही आणि त्या ठिकाणी जन्म नाही. त्या ठिकाणी रोग नाहीत. अखंड तारुण्य आहे. रोग होत नाहीत. वृद्धी नाही, क्षय नाही आणि भोग आहेत.

ज्या क्षणाला पुण्य संपले, म्हणजे तुमचा भोग संपला. पुढे काय ?

१. तुमचे पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही स्वर्गात रहाता. पुण्य संपले की, तुम्हाला एक क्षण स्वर्गात ठेवत नाहीत.

२. एका क्षणात पृथ्वीवर फेकून देतात, मग लगेच खाली येता.

३. मग पृथ्वीवर येतांना मोठे वाईट वाटते. स्वर्गातून आलेल्या माणसाला पृथ्वीवर पुष्कळ वेदना होतात.

४. इहलोकात अनेक कटकटी, पाणी नाही, वीज नाही, अमुक नाही, ‘टॅक्स’ (कर) भरण्यापासून ते आधिव्याधीपर्यंत.’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक : ‘घनगर्जित’, जानेवारी २०२४)