त्रिगुणात्मक आणि त्रिगुणातीत ज्ञानांचा सत्मध्ये विराजमान असणारा आत्मा सद्गुरूंना गवसलेला असणे

सद्गुरूंच्या बाबतीत ‘शाब्दे परे च निष्णातम् ।’ (श्रीमद्भागवत, स्कन्ध ११, अध्याय ३, श्लोक २१) म्हणजे ‘शब्दज्ञानी आणि ब्रह्मानुभवी असे गुरु’ अशी बिरुदावली लावण्यात येते.

अवतार आणि अवतरण यांच्यातील भेद !

‘जे कंस आणि रावण यासारख्यांच्या संहाराचे मोठे निमित्त घेऊन येतात आणि दुष्टांचे दमन करत जगाला योग्य मार्ग दाखवतात, त्यांना म्हणतात, नैमित्तिक अवतार ! जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म जोर पकडतो (माजतो) तेव्हा तेव्हा भगवंताच्या शक्तीचे, चेतनेचे अवतरण होते.

भगवंताकडे घेऊन जाणारे नाम !

नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत् म्हणजे भगवंत ! त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म ! इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, तर नाम हे साक्षात् भगवंताकडे पोचवते.

साधना म्हणून पैसे कमवतांना आणि ते खर्च करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक करू नका !

कर्तव्य म्हणून सत्‌मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत’, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते.

साधकातील भाव कसे कार्य करतो !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मर्दन करण्याची सेवा करून आलेल्या साधकात भाव न्यून असल्याने त्याच्या मनाची स्थिती चांगली नसणे; मात्र त्या साधकाकडे पहाणार्‍या अन्य साधकाचा भाव चांगला असल्याने त्या साधकाला संतांतील चैतन्याचा अधिक लाभ होणे

नाम घेण्याचे महत्त्व !

नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते, तिथे भगवंताला यावे लागल्याने शरिरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा.

भगवंताचे नाम अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता घ्यावे !

भगवंत हा सर्वसत्ताधीश खरा; पण एका विषयामध्ये तो लुळापांगळा होतो आणि सहज अडकतो. भुंगा जसा लाकूड पोखरतो; पण कमळात अडकतो, तीच स्थिती नामाविषयी भगवंताची होते.

कर्तेपण मेल्याखेरीज भगवंत प्रसन्न होणार नाही !

‘राम कर्ता म्हणेल तो सुखी’, ‘मी कर्ता म्हणेल तो दुःखी’. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे. कोणत्याही चांगल्या-वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका.

‘मी कर्ता नसून राम कर्ता आहे’, असे म्हणणे महत्त्वाचे !

माझेपण सोडावे म्हणजे ‘मी’चा बोध होतो. ‘भगवंत चहूकडे भरलेला आहे’, असे आपण नुसते तोंडाने म्हणतो; पण त्याप्रमाणे वागत नाही, हे आपले मूळ चुकते. भगवंत माझ्यात आहे, तसाच तो दुसर्‍यातही आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

गुरु जे सांगतात ते अर्थपूर्ण असते. त्या सांगण्यातील तत्त्वाशी एकरूप होणे, म्हणजेच ‘अर्थमय’ होऊन जाणे होय.’