बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय

स्वामी विवेकानंद

बहुतांच्या हितासाठी आणि बहुतांच्या सुखासाठी निःस्वार्थ भावाने अन् भक्तीपूर्ण हृदयाने समस्त सहृदय, तसेच स्वदेशप्रेमी विद्वज्जनांना या आधुनिक भारताच्या सर्व प्रश्नांची चर्चा करून ते सोडवण्यासाठी आवाहन करत आहे. कुणाहीविषयी यत्किंचितही द्वेष न बाळगता आणि कुणाही व्यक्तीसंबंधी, समाजासंबंधी वा सांप्रदायासंबंधी कदापि कटू शब्द न वापरता सर्वच संप्रदाय, पंथ यांच्या अन् सर्वच वर्गांच्या सेवेसाठी ‘उद्बोधन’ करून स्वतःला समर्पित करा. आपला अधिकार कर्म करण्याचा फळ देणे प्रभूच्या हाती ! आमची त्याला केवळ एवढीच प्रार्थना आहे, ‘हे प्रभो, तू ओजस्वरूप आहेस, आम्हाला ओजस्वी कर. तू वीर्यस्वरूप आहेस, आम्हाला वीर्यवान कर. तू बलस्वरूप आहेस, आम्हाला बलवान कर.’ – स्वामी विवेकानंद