देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात धर्मप्रेमींकडून त्या देवतांचे नामजप करून घ्यावे !

देवतांच्या जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ सत्संगात त्या देवतांचे नामजप करून घेऊ शकतो, जसे श्रीरामनवमीच्या दिवशी ‘श्रीरामा’चा. २९.१२.२०२० या दिवशी दत्तजयंती आहे. त्या दिवशी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करून घेऊ शकतो. 

सांगली येथील जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळा पार पडला

जिल्ह्यात गेले ८ मास सनातन संस्थेच्या माध्यमातून विविध साधना सत्संग घेतले जात आहेत. या सत्संगांच्या माध्यमातून जोडलेल्या जिज्ञासूंना साधनेची पुढची दिशा मिळावी, यासाठी १९ डिसेंबर या दिवशी एका ऑनलाईन सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी त्यांच्या सद्गुरु सन्मान सोहळ्यानंतर साधकांना केलेले मार्गदर्शन

गुरुदेव आपल्याला भरभरून देतही आहेत. आपण त्यांना अन्य काहीच देऊ शकत नाही. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांनी साधनेमध्ये प्रगती करून त्यांनासुद्धा आनंद देण्याचा प्रयत्न करूया. आपण ‘केवळ त्यांना आनंद देऊ शकतो’.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या चरणी साधकांनी कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली काव्यसुमने !

धर्मप्रसाराचे शिवधनुष्य धारण करूनी ।
पुढे घेऊन जाता गुरुमाऊलींच्या ज्ञानाचा वसा ।
देवालाही कौतुक वाटे असा प्रेमळ सत्संग आपला ॥

‘अष्टम अखिल भारतीय हिंदु अधिवेशना’मध्ये सूत्रसंचालनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सूत्रसंचालन करण्याची सेवा करतांना आनंदाची अनुभूती येऊन ‘आयत्या वेळी येणारे अडचणींचे प्रसंग स्थिर राहून सकारात्मकतेने कसे सोडवता येतील ?’, हे शिकायला मिळणे….