आनंदाची अनुभूती देणारा अद्भुत असा ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा सोहळा पहाणार्‍या पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

‘याची देही, याची डोळा’ भावावस्था अनुभवण्यास देऊन आनंदाची अनुभूती देणारा अद्भुत असा ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा सोहळा पहाणार्‍या पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

‘गुरु-शिष्य परंपरा’ हीच भारताची खरी ओळख; मात्र दळणवळण बंदीमुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना ५.७.२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रत्यक्ष सोहळ्यांचे आयोजन करता आले नाही. असे जरी असले, तरी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवांना जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘जीवनातील साधनेचे महत्त्व समजले, जीवनाला नवी दिशा मिळाली, आपत्काळाचे महत्त्व मनावर बिंबले, गुरुपूजनाचा आनंद घेता आला’, यांसारख्या प्रातिनिधिक स्वरूपाचे मनोगत अनेक जिज्ञासूंनी व्यक्त केले.

१. सौ. स्नेहल पांडे, चिंचवड

त्यानंतर सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे ‘आपत्काळात टिकण्यासाठी साधनाच केली पाहिजे. साधना केली, तरच ईश्‍वर आपले रक्षण  करील’, हेही समजले. ‘पुढे येणार्‍या आपत्काळासाठी कोणत्या कृती कराव्यात ? कुठल्या गोष्टींचा साठा करून ठेवावा ?’, यांविषयी चांगली माहिती मिळाली.

२.  श्री. भागवत येप्रे आणि श्री. सचिन भापकर (श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ)

घरातील सर्वांनी गुरुपौर्णिमा सोहळा पाहिला. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने कशी करावी ?’, ते आणखी सविस्तर सांगा.

३. सौ. कल्पना सांगळे (‘सनातन प्रभात’च्या वाचक)

सोहळा पाहिल्यावर ‘स्वभावदोष आणि अहं कसे घालवायचे ?’, हे लक्षात आले.

४. सौ. अनिता तळेकर, शिरवळ, पुणे

गुरुपौर्णिमा महोत्सवाचा कार्यक्रम फारच चांगला झाला. ‘मी तो कार्यक्रम जणू काही रामनाथी आश्रमात बसून पहात आहे’, असेच मला वाटत होते. गुरुपूजन चालू असतांना घरातील वातावरण चैतन्यमय झाले होते. ‘मी परमपूज्य गुरुदेवांच्या पादुकांवर फुले अर्पण करत आहे’, अशी अनुभूती मला आली.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांच्या मार्गदर्शनातून येणार्‍या आपत्काळाच्या स्थितीची माहिती मिळाली. हिंदूंंचे कर्तव्य, हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा इत्यादी माहितीही समजली. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पुष्कळ काही सांगून गेला.

५. श्री. प्रताप ठाकूर (धर्मप्रेमी), सातारा रस्ता, पुणे

मला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम फार आवडला. भक्तीमार्ग हाच श्रेष्ठ मार्ग आहे. मला प्रत्यक्ष गुरुमाऊलीना भेटायला जमले नाही; परंतु या सोहळ्याच्या माध्यमातून मला गुरुदेवांचे दर्शन झाले. मला नामजप करतांना ज्या अडचणी येत आहेत, त्या मी सत्संगात सांगणार आहे. आम्ही घरातील सर्वांनी एकत्र बसून सोहळा पाहिला. ‘आपत्काळाची तीव्रता किती भयानक आहे ? आणि आपल्याला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत ?’, हे समजले. ‘नामजप करण्याविना पर्याय नाही’, याची मला जाणीव झाली. मी माझे नातेवाईक आणि मित्र यांना याविषयी माहिती सांगणार आहे.

६. श्री. चैतन्य सुतार (धर्मप्रेमी), सातारा रस्ता, पुणे

आम्ही सर्व जण घरात गोंदवलेकर महाराज यांची पूजा आणि श्रीरामाचा नामजप करतो. ‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामुळे साधना आणखी वाढवायला हवी, तरच आपले रक्षण होणार आहे’, हे कळले. ‘प्रार्थना कशी करावी ? भावपूर्ण नामजप करण्यासाठी आणि साधना वाढवण्यासाठी काय करायचे ?’, याविषयी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा.

७. सौ. वैशाली काकडे (धर्मप्रेमी), सातारा रस्ता, पुणे

प्रतिवर्षी सभागृहात गुरुपौर्णिमा असते; पण या वेळी देवाने आपत्काळात घरी राहूनच गुरुपूजनाची संधी दिली. ‘पुढे येणार्‍या आपत्काळात कशी साधना करायची ?’, हे शिकायला मिळाले. यजमानांना पुष्कळ प्रश्‍न असायचे. त्यांना त्यांची उत्तरे मिळाली. तेव्हा फार चांगले वाटले.

८. श्री. रमेश विरुपाक्ष नवलगुंदे (पोलीस), हडपसर, पुणे

प्रवचन ऐकून मी नामजप चालू केला आहे. यापुढील काळात मला धर्मकार्य करायचे आहे. मी समाजातील लोकांना ‘लिंक’ पाठवतो.

९ . सौ. स्वाती ठाकरे (सनातन प्रभातच्या वाचक), सिंहगड रस्ता, पुणे

‘घरात राहून साधना कशी करू शकतो ? आणि घरात सकारात्मक स्पंदने कशी निर्माण होतात ?’, हे कळले.

१०. श्री. अशोक यादव (हितचिंतक), विश्रांतवाडी, पुणे 

आम्ही बैठकीला जातो. नामजप करतो; पण आम्हाला इतकी सखोल माहिती कधीच मिळाली नव्हती. आता आमच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली.

११. सौ. कल्पना धुरी (हितचिंतक), विश्रांतवाडी, पुणे

मला नामजपाविषयी अधिक माहिती हवी आहे. ‘नामजप कसा शोधायचा ?’, या माहितीसाठी ग्रंथ हवा आहे.

१२. श्री. नितीन बर्गे (‘प्रोफाईल मेंबर’), विश्रांतवाडी, पुणे

माझ्या आयुष्यात मला प्रथमच असे मार्गदर्शन मिळाले. ‘मला साधना करावी’, असे वाटले. मला सनातन संस्थेचे ग्रंथ हवे आहेत.

१३. सौ. वृषाली शेलार (सनातन प्रभातच्या वाचक), विश्रांतवाडी, पुणे

मी सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांचे मार्गदर्शन ऐकले. मला साधनेविषयी अजून जाणून घ्यायचे आहे.

१४. सौ. विद्या वैद्य (हितचिंतक), धायरी, पुणे

गुरुपूजन पहातांना ‘प्रत्यक्ष मी गुरुपूजा करत आहे’, असे मला जाणवत होते. गुरुपूजन पाहून माझी भावजागृती झाली. ‘येणार्‍या आपत्काळात साधना कशी करायची ?’, हे मला शिकायला मिळाले.

१५. सौ. सुवर्णा चंदनशिव (हितचिंतक), पुणे

‘आपत्काळात साधना कशी करायची ? कुठले गुण असायला हवेत ?’, हे कळले. गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करण्यासाठी प्रयत्न करणार.

१६. सौ. प्रियांका शेखर नवलगुंदे (गृहिणी), पुणे

आम्ही घरातील सर्वांनी एकत्र बसून कार्यक्रम ऐकला. प्रवचन ऐकून नामजप चालू करण्यासाठी नामजपाची ध्वनीफित (ऑडिओ) मागून घेतली. मी मैत्रिणींसाठी प्रवचन घेण्याची सिद्धता दाखवली.

१७. सौ. पौर्णिमा खोपडे (हितचिंतक), भोर

गुरुपूजन होत असतांना माझा भाव पुष्कळ प्रमाणात जागृत झाला.

१८. सौ. मनीषा भालेराव (धर्मप्रेमी), मंचर, पुणे

‘साधनेत भावाला महत्त्व आहे’, हे समजले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी येणार्‍या आपत्काळाविषयी माहिती देऊन सतर्क केले.

सातारा येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

१. सौ. दुर्गावती रवींद्र सुतार : सनातन संस्थेचा गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष भाग प्रथमच पहायला मिळाला. साधनेचे महत्त्व समजले. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ?’, ते लक्षात आले. ‘येणार्‍या आपत्काळात कशी सिद्धता करायची ?’, ते समजले. माझे मन अस्थिर होते; पण या कार्यक्रमामुळे माझे मन शांत झाले.

२. जयश्री वाघ : कार्यक्रम चालू झाल्यापासून माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. घरात बसून गुरुपौर्णिमा पूजनाचा कार्यक्रम पहायला मिळाल्याने मला कृतज्ञता वाटली.

३. सौ. स्वाती शिंदे, कासुर्डी : गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम बघून मला फार चांगले वाटले.

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक