हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंनी साधना करावी ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

सद्गुरु नंदकुमार जाधव

‘मेकॉले’ शिक्षणपद्धतीमुळे आपण शिक्षित होत आहोत; पण धर्मापासून दूर जात आहोत. धर्माचरण करणे न्यूनतेचे वाटत आहे; पण संस्कृती सोडल्याचा परिणाम आज प्रत्येक घरात दिसत आहे. आज अनेकांना टिळा लावायला लाज वाटते; पण टिळा हा इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर ‘यातून मला आध्यात्मिक लाभ मिळणार आहे’, यासाठी टिळा लावा, असे जालना येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आवाहन केले.