डॉनल्ड ट्रम्प यांची धमकी

वॉशिंग्टन (अमेरिका) – जर रशिया किंवा युक्रेन शांतता करारासाठी सिद्ध नसतील, तर ते एक मूर्खपणाचे पाऊल असेल आणि आम्ही शांतता करारातून बाहेर पडू, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो म्हणाले होते की, जर येत्या काळात रशिया आणि युक्रेन यांनी युद्ध संपवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, तर अमेरिका शांततेचे प्रयत्न सोडून देईल.
🚨 Trump threatens to walk away from Russia-Ukraine peace talks if there's no progress.💥🇷🇺🇺🇸🇺🇦 #Zelensky #Putinpic.twitter.com/vtq72XLc0z
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2025
डॉनल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ चालू होऊन जवळपास ९० दिवस झाले आहेत. या काळात युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका अन् रशिया यांच्यामध्ये अनेक चर्चा झाल्या आहेत; परंतु ट्रम्प प्रशासनाला अद्याप हे युद्ध थांबवण्यात यश मिळालेले नाही.