Russia Attack On Indian Pharma Warehouse : आम्ही युक्रेनमधील भारतीय औषध आस्थापनाच्या गोदामावर क्षेपणास्त्र डागले नव्हते ! – रशियाचे ६ दिवसांनंतर स्पष्टीकरण

घटनास्थळ

कीव (युक्रेन) – रशियाने ‘कुसुम’ नावाच्या एका भारतीय औषध आस्थापनाच्या गोदामावर १२ एप्रिल या दिवशी क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केल्याचा दावा युक्रेनच्या भारतातील दूतावासाने केला होता. त्या वेळी रशियाने यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती; मात्र आता भारतातील रशियाच्या दूतावासाने अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करत गोदामावर आक्रमण केल्याचा युक्रेनचा दावा फेटाळून लावला आहे.

रशियाच्या दूतावासाने म्हटले की, रशियाच्या सशस्त्र दलांनी १२ एप्रिल २०२५ या दिवशी कीवच्या पूर्व भागात असलेल्या भारतीय औषध आस्थापनाच्या गोदामावर आक्रमण केले नव्हते. तसेच कोणत्याही आक्रमणाची योजनादेखील आखली नव्हती.