Russia Refuses US Proposal : युक्रेनसमवेतचे युद्ध संपवण्याच्या संदर्भातील अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारण्यास रशियाचा नकार

रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रयाबकोव्ह

मॉस्को (रशिया) : युक्रेनशी चालू असलेले युद्ध संपवण्याची अमेरिकेने दिलेली सूत्रे आणि उपाय आम्ही गांभीर्याने घेतो; पण सध्याच्या स्वरूपात ती स्वीकारू शकत नाही, अशी माहिती रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्गेई रयाबकोव्ह यांनी दिली. ते ‘इंटरनॅशनल अफेअर्स’ या रशियातील नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. युद्ध संपवण्याच्या प्रयत्नात अमेरिका आणि रशिया यांच्यातील चर्चा रखडल्याचे यावरून दिसून येते.

युक्रेनने ‘नाटो’मध्ये अर्थात् ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’मध्ये सहभागी होण्याची महत्त्वाकांक्षा सोडून द्यावी, युक्रेनच्या सैन्याचा आकार मर्यादित करावा आणि रशियाला युक्रेनच्या ४ प्रदेशांवर नियंत्रण द्यावे, असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केले आहे, तर युक्रेनचे म्हणणे आहे की, या मागण्या म्हणजे रशियाला शरण गेल्यासारखे आहेत.