अपघातात घायाळ झालेल्या दोघांना पोलिसांनी साहाय्य नाकारल्याने त्यांचा मृत्यू

उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात रस्ते अपघातात गंभीररित्या घायाळ झालेल्या २ मुलांना पोलिसांनी साहाय्य करण्यास नकार दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे घडली

देहलीतील राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मृतदेहावरून धावत होत्या गाड्या !

राजधानी देहलीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर अपघात झालेल्या एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहावरून अनेक गाड्या गेल्याचे मन खिन्न करणारे दृश्य येथे पहायला मिळाले.

डहाणू येथे समुद्रात बोट उलटून ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

हे विद्यार्थी डहाणू येथील के.एल्. पोंडा हायस्कूलमधील ११ वी आणि १२ वीचे विद्यार्थी आहेत. ते सहलीसाठी डहाणू येथे आले होते.

डहाणू (जिल्हा पालघर) येथे हेलिकॉप्टर कोसळून चौघांचा मृत्यू

मुंबईपासून ३० नॉटिकल मैलावर गेल्यानंतर ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’शी या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. त्यामुळे हे हेलिकॉप्टर ओएन्जीसीच्या समुद्रातील तेल केंद्राजवळ पोहोचलेच नाही.

वांगी (जिल्हा सांगली) येथे झालेल्या अपघातात ६ पैलवानांचा मृत्यू

कडेगाव तालुक्यातील वांगी येथे १३ जानेवारीला ट्रॅक्टर आणि क्रूझर या वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ५ पैलवानांचा जागीच, तर एका पैलवानाचा रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला.

सांताक्रूझ येथील ‘डोमेस्टिक विमानतळा’ला आग

शहरातील सांताक्रूझ येथील डोमेस्टिक विमानतळावरील टर्मिनल १ बी मधील कॉन्फरन्स हॉलला १३ जानेवारीला दुपारी आग लागली. आगीमुळे जीवितहानी झाली नाही.

हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साहाय्याने उतरतांना दोरी तुटून अपघात : ३ सैनिक घायाळ

सैन्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीतील आर्मी परेड मैदानावर हेलिकॉप्टरमधून दोरीच्या साहाय्याने उतरण्याचा सैनिकांचा सराव चालू असतांना हेलिकॉप्टरची दोरी तुटून अपघात झाला.

कमला मिलप्रकरणातील आरोपीला आश्रय देणारा क्रिकेटपटू विशाल कारिया याला अटक

कमला मिलमध्ये लागलेल्या आगीच्या प्रकरणी ‘वन अबव्ह’ च्या मालकांवर गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांना आश्रय दिल्यामुळे पोलिसांनी क्रिकेटपटू विशाल कारिया याला कह्यात घेतले आहे.

ठाणे येथील उपाहारगृहांच्या मालकांना अग्नीशमनाच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ घोषित

महापालिका क्षेत्रात अग्नीशमनाचे नियम धाब्यावर बसवून चालू असलेली उपाहारगृहे, लॉज, बार आणि हुक्का पार्लर यांच्यावरील कारवाई पुढील पंधरवड्यापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

निष्काळजीपणा भोवतोय !

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरामागे आग लागण्याच्या प्रकारांचे शुक्लकाष्ठ लागले आहे. याचे खापर प्रशासनावर फोडले जाते.


Multi Language |Offline reading | PDF