लोणी काळभोर (पुणे) येथे विज्ञापन फलक कोसळल्याच्या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा नोंद !

या घटनेत वरातीचा घोडा आणि ३ जण घायाळ झाले होते. त्या प्रकरणी जागामालक शरद कामठे आणि ठेकेदार संजय नवले अन् बाळासाहेब शिंदे यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Hariyana bus incident : हरियाणामध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीमध्ये ८ जणांचा मृत्यू  

हरियाणातील कुंडली पानेसर महामार्गावर रात्री एका धावत्या बसला लागलेल्या आगीमध्ये ८ भाविकांचा मृत्यू झाला. ही बस भाविकांना मथुरा आणि वृंदावन या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून पुन्हा पंजाब येथे जात असतांना तिला आग लागली.

संपादकीय : जीवघेणे अनधिकृत फलक !

१३ मेच्या संध्याकाळी मुंबईत वादळी वार्‍यासह आलेल्या पावसात घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग (फलक) कोसळून झालेला भीषण अपघात आणि त्यामुळे मोठी जीवित अन् वित्त हानी झाली.

घाटकोपर दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, होर्डिंग उभारणार्‍या आस्थापनाचा संचालक भूमीगत !

मोठमोठ्या होर्डिंगमुळे येणार्‍या अडचणींचा विचार दुर्घटना घडल्यावर केला जातो हे संतापजनक !

Bihar Lightning Deaths : बिहारमध्ये वीज पडून ११ जणांचा मृत्यू !

एकीकडे पावसाची शक्यता असतांना देशातील काही राज्यांमधील काही भागांत उष्णतेचा प्रभाव कायम आहे. राजस्थान, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगाणा राज्यांमध्ये काही भागात तापमान ४० ते ४३ अंशांच्या दरम्यान नोंदवले जात आहे.

Chardham Yatra Huge Crowd : चारधाम यात्रेच्या दुसर्‍याच दिवशी यमुनोत्रीच्या चिंचोळ्या ४ कि.मी. मार्गावर प्रचंड गर्दी

समुद्रसपाटीपासून १० सहस्र ७९७ फूट उंचीवर असलेल्या यमुनोत्री मंदिरापर्यंतचा हा मार्ग ! एका बाजूला डोंगर आणि दुसर्‍या बाजूला खोल खंदक. गर्दीत लहान मुले, वृद्ध, महिला आणि शेकडो खेचर होते. एक खेचरही भरकटले असते, तर सहस्रो लोकांचे जीव अडचणीत आले असते.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुलुंड येथे ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त ! ; मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ! …

मुलुंड परिसरात एका चारचाकीतून पोलिसांनी ४७ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी ही रक्कम, गाडी आणि गाडीचालक यांना कह्यात घेतले असून या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

पीलीभीत (उत्तरप्रदेश) येथे अपघातात ३ कामगारांचा मृत्यू !

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घायाळांना ट्रकमधून बाहेर काढले. घायाळ कामगारांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात भरती करण्यात आले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :आजपासून कोकण रेल्वेमार्गावर २ अधिक गाड्या !; प्रचार चालू असतांना अंबादास दानवे यांचे अपघातग्रस्ताला साहाय्य…

उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मडगाव ते पनवेल, तसेच पनवेल ते सावंतवाडी अशा दोन विशेष गाड्या कोकण रेल्वेमार्गावर धावतील.

Accident In Rajasthan:राजस्थानमध्ये चारचाकी गाडीच्या अपघातात ६ जणांचा मृत्यू

५ मे या दिवशी सकाळी ८ वाजता सवाई माधोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनास पुलियाजवळ त्यांची गाडी ट्रॅक्टरला धडकली.