छत्तीसगडमध्ये पिकअप वाहन दरीत कोसळून १९ जणांचा मृत्यू

कवर्धा (छत्तीसगड) – येथील बाहपानी भागात पिकअप गाडी दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ जणांना मृत्यू झाला. यांपैकी १८ महिला असून  त्या सर्व आदिवासी आहेत. या गाडीमध्ये जवळपास ३६ जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोचल्या अन् त्यांनी साहाय्यता कार्य करत अनेक घायाळांना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात भरती केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनविषयी शोक व्यक्त केला आहे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दुःख व्यक्त केले आहे.