गंगाजलावर वैज्ञानिक संशोधन

१. ‘वर्ष १९३१ मध्ये प्रख्यात जल विशेषज्ञ डॉ. एफ्. कोहिमान भारतात आले. त्यांनी संशोधनासाठी वाराणसीवरून गंगाजल घेतले. वर्ष १९३२ मध्ये त्यांनी जे काही लिहिले त्याचा निष्कर्ष होता की,

अ. गंगाजल अत्यंत स्वच्छ आणि पवित्र आहे.

आ. यामध्ये रक्तातील ‘हिमोग्लोबीन’ वाढवण्याची शक्ती आहे.

इ. यामध्ये जतूंचा नाश करण्याची अद्भुत क्षमता आहे.

ई. संपूर्ण शरीर अशक्त झाल्यावर गंगाजल दिल्यामुळे रुग्णाची जीवन शक्ती वाढते.

उ. गंगाजलाचा उपयोग केल्यामुळे रोगी आश्‍चर्यजनक आनंद अनुभवतो.

२. विख्यात फ्रेंच डॉ. डी. हरेल आणि अमेरिकेचे एक प्रसिद्ध लेखक मार्केटवेव्ह यांनी म्हटले आहे की, गंगाजल हे संसर्गजन्य रोगांना नष्ट करण्यासाठी सर्वश्रेष्ठ उपयोगी जल आहे.

३. वर्ष १९२४ मध्ये बर्लिनचे प्रसिद्ध डॉ. जे. ओलिवर यांनी बहुतेक सर्व प्रसिद्ध नद्यांच्या पाण्यांच्या चाचण्या केल्या. त्यांचा एक लेख ‘न्यूयॉर्क इंटरनॅशनल मेडिकल जर्नल’मध्ये प्रकाशित झाला. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले होते की, गंगाजल हे जगातील सर्व नद्यांच्या पाण्यांपैकी सर्वाधिक स्वच्छ, जंतूनाशक आणि आरोग्यदायी आहे.

४. विज्ञानाचार्य हनवरी यांनी म्हटले की,

अ. गंगाजलामध्ये अशी काही तत्त्वे अस्तित्वात आहेत, ज्यामध्ये पटकीचे (‘कॉलरा’चे) जंतू नष्ट करण्याची शक्ती आहे.

आ. गंगाजल गरम केल्यावर त्याची जंतूंना नष्ट करण्याची शक्ती निघून जाते; त्यामुळे गंगाजल गरम करणे किंवा उकळणे, हे निषिद्ध मानले जाते.

५. गंगेचे अनन्य भक्त पंडित श्री. दया शंकर दुबे यांचे म्हणणे आहे की, गंगाजल पिण्यामुळे आणि गंगाजलाने स्नान केल्यामुळे शरिरात अपूर्व शक्ती अन् क्षमता येते. गंगाजलाने स्नान केल्यामुळे मेंदूचे सर्व रोग आणि त्वचा रोग बरे होतात.

(साभार : मासिक ‘कल्याण’, सप्टेंबर २००३)