हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळ
देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही देशाची सर्वपक्षीय सरकारे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखू शकत नसतील, तर ती आतंकवाद, नक्षलवाद, घुसखोरी, परकीय आक्रमणे यांपासून राष्ट्राचे रक्षण कसे करतील ? याचा विचार करा ! – संपादक
मथुरा (उत्तरप्रदेश) – १५ ऑगस्टच्या निमित्ताने खरेदी केलेले प्लास्टिकचे राष्ट्रध्वज काही वेळानंतर रस्त्याच्या कडेला, शाळांमध्ये आणि कचर्याच्या ठिकाणी पडलेले आढळून येतात. त्यामुळे राष्ट्रभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात. तसे होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्री करणार्यांच्या विरोधात योग्य कारवाई करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शहर दंडाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अरविंद गुप्ता, डॉ. भूपेश शर्मा, श्री. जीवन शर्मा, सीमा शर्मा, क्षमा गुप्ता आदी उपस्थित होते.