RBI Brings Back Gold : ब्रिटनमधील सेंट्रल बँकेत अनेक वर्षे असलेले १०० टनांहून अधिक सोने रिझव्हॅ बँकेने पुन्हा भारतात आणले !

नवी देहली – भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनकडे असलेले भारताचे १०० टनांहून अधिक सोने देशात परत भारतात आणले आहे. भविष्यात देशातील वित्तीय स्थिरता कायम राखण्यासाठी रिझर्व्ह बँक देशाच्या तिजोरीत सोन्याचे प्रमाण वाढवत आहे.

ताज्या आकड्यांनुसार मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत रिझर्व्ह बँकेजवळ ८२२.१ टन सोने होते. त्यांतील ४१३.८ टन सोने परदेशात ठेवण्यात आले होते. आता हेच सोने हळूहळू भारतात आणले जात आहे. बर्‍याच काळापासून जगभरातील सर्व केंद्रीय बँकांसाठी ‘बँक ऑफ इंग्लंड’ सर्वांत मोठे साठवणुकीचे केंद्र आहे. भारतदेखील स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून इग्लंडच्या बँकेत सोने ठेवत आहेत.