रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित !

दास यांनी वर्ष २०१८ मध्ये त्यांचा पदभार सांभाळल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले. २ सहस्त्र रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णयही नुकताच त्यांच्याच अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

गोव्यात २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या अधिसूचनेला अधिकोषांकडून हरताळ

‘रिझर्व्ह बँके’ने जरी अधिसूचना काढलेली असली, तरी ती अधिसूचना केवळ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’लाच यांनाच लागू आहे आणि इतर अधिकोषांना ती लागू नाही’, अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकोषांतील काही अधिकारी देत आहेत.

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्याविषयी शंकानिरसन 

भारतीय रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय १९ मे २०२३ या दिवशी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केला. त्याची कार्यवाही कशी होईल ? आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल ?, याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

२ सहस्र रुपयांच्या नोटा ओळखपत्राविना पालटण्याच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

श्री. उपाध्याय यांच्या याचिकेमध्ये रिझर्व्ह बँकेचा निर्णय मनमानी, तर्कहीन आणि राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन आहे, असे म्हटले आहे.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये कोणत्याही ओळखपत्राविना पालटू शकता २ सहस्र रुपयांच्या नोटा !

१९ मे या दिवशी रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केल्यावर सामाजिक माध्यमांतून त्या जमा करण्यासंदर्भात अनेक उलट-सुलट गोष्टी पसरवल्या जात आहेत.

२ सहस्र रुपयांच्‍या नोटांची छपाई बंद ! – रिझर्व्‍ह बँकेचा निर्णय

सध्‍या चलनात असलेल्‍या २ सहस्र रुपयांच्‍या नोटा ३० सप्‍टेंबरपर्यंत वापरता येणार आहेत. त्‍यापूर्वी त्‍या बँकेत जमा करून दुसर्‍या नोटा घ्‍या, असे आवाहनही रिझर्व्‍ह बँकेने केले आहे. २ सहस्र रुपयांच्‍या नोटा केंद्र सरकारने नोटबंदीच्‍या वेळी छापल्‍या होत्‍या.

देशातील ९५ सहस्र ९२९ घोटाळ्‍यांत ३२ सहस्र ९१ कोटींचा अपहार !

‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी पोलिसांत ‘सायबर क्राईम’ असा स्‍वतंत्र विभाग आहे; मात्र रिझर्व्‍ह बँकेत ‘ऑनलाईन’ फसवणुकीसाठी ‘सायबर क्राईम’ असे वर्गीकरणच नाही. वर्ष २०२२-२३ मध्‍ये आर्.बी.आय.अंतर्गत येत असलेल्‍या देशातील सर्व बँकांमध्‍ये एकूण ९५ सहस्र ९२९ घोटाळे झाले.

रिझर्व्ह बँकेकडून ६ सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई !      

बँकिंग नियमन कायदा १९५० चे उल्लंघन आणि ठेवींवरील व्याजदराशी निगडित रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे येथील २ अधिकोषांवर रिझर्व्‍ह बँकेचे आर्थिक निर्बंध !

थकबाकीचे प्रमाण वाढल्‍याने रिझर्व्‍ह बँकेने ‘डिफेन्‍स अकाऊंट्‌स को-ऑपरेटिव्‍ह बँक’ आणि ‘पुणे सहकारी बॅँक लिमिटेड’ या दोन्‍हींवर आर्थिक निर्बंध लागू केले आहेत.