
नगर, १२ एप्रिल – अंत्यविधी आणि दशक्रियाविधी यांना होणार्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत. प्रतिदिन कोरोनाचा वाढत असलेला संसर्ग, होणारे मृत्यू आणि पुरोहितांची सुरक्षितता यांचा विचार करून नगरमध्ये होणारे सर्व दशक्रिया विधी ३० एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित संघटनेने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरोहित मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान हे कोरोनाबाधित असल्याची माहिती लपवत आहेत. गर्दीतच विधी करण्यासाठी पुरोहितांवर दबाव आणला जातो. त्यामुळे पुरोहितांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !