यवतमाळ – येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांनी पूर्णतः भरलेले आहे. त्यामुळे आता तेथे खाटाच शिल्लक नाहीत. रुग्णांना चिकित्सालयाच्या बाहेरच झोपून रहावे लागत आहे. ऑक्सिजनची आवश्यकता असणारे रुग्णही बाहेर बाकड्यावर बसून असतात. तेथेच त्यांना ऑक्सिजन पुरवला जातो. एका रुग्णाला भरती करून घेण्यासाठी २ – ३ घंट्यांचा वेळ लागतो. त्यामुळे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो.