पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिराचा संगीत महोत्सव यंदाही रहित

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्णय !

पुणे, १२ एप्रिल – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणपति मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त प्रतिवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या काळात संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचा यावर्षी ३८ वा वर्धापनदिन आहे; मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षीचाही संगीत महोत्सव आणि इतर कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. दैनंदिन धार्मिक विधी मात्र मंदिरात चालू रहाणार आहेत.

भाविकांकरिता अभिषेक व्यवस्था आणि इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. २४ घंटे ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली असून भाविकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.