ठाकुर्लीजवळ वातानुकूलित लोकलवर दगडफेक करणार्‍या २ गर्दुल्‍ल्‍यांना अटक !

वातानुकूलित लोकलची काच फुटली असून मोठी हानी झाली आहे, तर खिडकीजवळ बसलेली एक महिला किरकोळ घायाळ झाली आहे.

पुणे येथील रेल्‍वेच्‍या जागेतील अवैध संस्‍थेत मुलींवर अत्‍याचार !

रेल्‍वेच्‍या जागेत अवैध संस्‍था चालू होईपर्यंत रेल्‍वे प्रशासन काय करत होते ? अशा प्रकारे अवैध संस्‍था काढून सुरक्षादलातील हवालदारच अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार करत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ?

कोकण रेल्वेमार्गावर ९ आणि १० नोव्हेंबरला ‘मेगा ब्लॉक’

९ आणि १० नोव्हेंबर या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे मार्गाच्या अन् मालमत्तेच्या देखभालीसाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

 ३ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेमार्गावर उधना ते मंगळुरू दिवाळी विशेष गाडी धावणार

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उधना (गुजरात) ते मंगळुरू (कर्नाटक) अशी कोकण रेल्वेमार्गे धावणारी विशेष गाडी ३ नोव्हेंबर २०२३ पासून धावणार आहे.

प्रवासी आणि माल वाहतुकीसह सर्वच क्षेत्रांत कोकण रेल्वेने केली सर्वोच्च कामगिरी ! – संजय गुप्ता

कोकण रेल्वेने ३ सहस्र २७४.७० कोटी रुपयांचा सर्वाधिक प्रकल्प महसूल मिळण्यासमवेतच ५ सहस्र १५२.२३ कोटी रुपयांचा एकूण महसूल कमावला आहे.

Pakistan Railway Employees Strike : २ नोव्हेंबर नंतर पाकिस्तानचे रेल्वे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता !

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानचे रेल्वे कर्मचारी २ नोव्हेंबरपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर मासापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. २ नोव्हेंबर या दिवशी वेतन देण्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

कोकण रेल्वेमार्गावर ३१ ऑक्टोबरला ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ३१ ऑक्टोबर या दिवशी ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’ करण्यात येणार आहे. यामुळे ३१ ऑक्टोबरला ६ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

पोलिसी गणवेशात ‘इंस्टाग्राम’वर रिल्स बनवणारे २ पोलीस निलंबित ! 

‘गणवेशातील व्यक्तीने शिस्तीचे पालन करण्याची आवश्यकता आहे. शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे’, असे अधिकार्‍याने स्पष्ट केले.

मुंबई पश्चिम रेल्वेमार्गाच्या कामामुळे अडीच सहस्रांहून अधिक रेल्वे फेर्‍या बंद होणार !

विरार आणि चर्चगेट या मार्गावरून येणार्‍या आणि जाणार्‍या रेल्वेगाड्या या कामानिमित्त रहित करण्यात येणार आहेत. या कालावधीत लांब पल्ल्याच्या ४३ गाड्याही रहित करण्यात आल्या आहेत.

‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आठवड्यातून ६ दिवस धावणार  

उन्हाळी वेळापत्रकानुसार मुंबई-गोवा मार्गावर काही रेल्वेगाड्यांना ताशी १०० ते १२० कि.मी. वेगाला संमती देण्यात आली आहे.