दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :माजी कुलगुरूंना मारहाण करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद; निकृष्‍ट जेवण देणार्‍या कंत्राटदारांना ५ लाख रुपये दंड होणार !…

मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्‍यान धावणार्‍या ‘वंदे भारत’ रेल्‍वेगाड्यांमध्‍ये निकृष्‍ट दर्जाचे जेवण मिळत होते. रेल्‍वेने याची गंभीर नोंद घेतली असून दोषी कंत्राटदारांना ५ लाख रुपयांपर्यंत कमाल दंड होणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्‍कम २५ सहस्र रुपये होती.

कोकणातील बेरोजगारांना अधिक संधी मिळायला हवी ! – शौकत मुकादम

कोकणातील बेरोजगारांना अधिक संधी मिळायला हवी. यासाठी परप्रांतीयांची निवड होता कामा नये, अशी चेतावणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईत रक्‍ताचा तुटवडा !; भारतीय रेल्‍वेत ३ सहस्र नवीन गाड्या !…

भारतीय रेल्‍वेच्‍या ताफ्‍यात ३ सहस्र नवीन गाड्यांचा समावेश होणार असल्‍याने कोकणात जाण्‍यासाठी वर्ष २०२७ पर्यंत प्रवाशांना निश्‍चित तिकीट उपलब्‍ध होणार आहे. सध्‍या प्रतिदिन १० सहस्र ७४८ रेल्‍वेगाड्या धावत आहेत. हा आकडा १३ सहस्रांपर्यंत वाढवण्‍यात येणार आहे.

पंढरपूर येथील कार्तिक यात्रेच्‍या निमित्ताने २० नोव्‍हेंबरपासून वारकर्‍यांसाठी विशेष रेल्‍वे !

पंढरपूर येथील कार्तिक यात्रेसाठी २० ते २७ नोव्‍हेंबर या कालावधीत मध्‍य रेल्‍वेकडून वारकर्‍यांसाठी विशेष रेल्‍वेगाड्या उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत.

मध्‍य रेल्‍वेच्‍या ६ स्‍थानकांवर फलाट तिकीट विक्री बंद !

प्रवाशांच्‍या सुविधेसाठी सी.एस्.एम्.टी. आणि दादर येथे सायंकाळी ६ ते रात्री १२.३०, ठाणे येथे सायंकाळी ७ ते रात्री १.३०, कल्‍याण येथे सायंकाळी ६ ते रात्री १.३० वाजता, एल्.टी.टी. येथे सायंकाळी ६.३० ते रात्री १ पर्यंत आणि पनवेल येथे रात्री ११ ते २ वाजेपर्यंत फलाट तिकीट मिळणार नाही.

कोलकात्यात ३१ डिसेंबरपासून अंडरवॉटर मेट्रोचा होणार प्रारंभ

देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी कोलकातामध्ये धावणार आहे. भूमीपासून ३३ मीटर खाली आणि हुगळी नदीतळाच्या १३ मीटर खाली ५२० मीटर लांबीच्या बोगद्यात रुळ टाकण्यात आले आहेत.

ठाकुर्लीजवळ वातानुकूलित लोकलवर दगडफेक करणार्‍या २ गर्दुल्‍ल्‍यांना अटक !

वातानुकूलित लोकलची काच फुटली असून मोठी हानी झाली आहे, तर खिडकीजवळ बसलेली एक महिला किरकोळ घायाळ झाली आहे.

पुणे येथील रेल्‍वेच्‍या जागेतील अवैध संस्‍थेत मुलींवर अत्‍याचार !

रेल्‍वेच्‍या जागेत अवैध संस्‍था चालू होईपर्यंत रेल्‍वे प्रशासन काय करत होते ? अशा प्रकारे अवैध संस्‍था काढून सुरक्षादलातील हवालदारच अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार करत असतील, तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ?

कोकण रेल्वेमार्गावर ९ आणि १० नोव्हेंबरला ‘मेगा ब्लॉक’

९ आणि १० नोव्हेंबर या दिवशी कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे मार्गाच्या अन् मालमत्तेच्या देखभालीसाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.

 ३ नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेमार्गावर उधना ते मंगळुरू दिवाळी विशेष गाडी धावणार

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उधना (गुजरात) ते मंगळुरू (कर्नाटक) अशी कोकण रेल्वेमार्गे धावणारी विशेष गाडी ३ नोव्हेंबर २०२३ पासून धावणार आहे.