गोंडा (उत्तरप्रदेश) – चंडीगड येथून दिब्रुगड (आसाम) येथे जाणारी दिब्रुगड एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने झालेल्या अपघातात ४ प्रवशांचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक प्रवासी गंभीररित्या घायाळ झाले. या गाडीचे ६ डबे रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या अपघातानंतर २ रेल्वेगाड्या रहित करण्यात आल्या, तर ११ गाड्यांना दुसर्या मार्गावर वळवण्यात आले. सध्या येथे साहाय्यता कार्य चालू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. झिलाही रेल्वे स्थानकाजवळ गोसाई दिहवा येथे हा अपघात झाला.