केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करूनच रेल्वेमार्ग दुपदरीकरणावर निर्णय घेण्यात येणार आहे. रेल्वेमार्ग दुपदरीकरणाला होत असलेल्या विरोधाविषयी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना माहिती देण्यात आली आहे

पुणे येथे विमान आणि रेल्वे यांद्वारे परराज्यांतून येणार्‍या प्रवाशांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक

गेल्या काही दिवसांमध्ये शहरासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, या दृष्टीने राज्य सरकारने देहली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या ४ राज्यांतून येणार्‍या नागरिकांसाठी कोरोनाची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल बंधनकारक केला आहे.

प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होणार्‍या आमदारांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून समज

भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनीही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.

‘गोयांत कोळसो नाका’ संघटनेचा मंत्रीमंडळ बैठक चालू असतांना सचिवालयावर मोर्चा

‘गोयांत कोळसो नाका’ या अशासकीय संघटनेने राज्य मंत्रीमंडळ बैठक चालू असतांना सचिवालयावर मोर्चा नेला.

कोकण रेल्वेमार्गावर हुंबरठ येथे रेल्वेची धडक बसून महिलेचा मृत्यू

कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्‍या गाडीची धडक बसून तालुक्यातील बौद्धवाडी, हुंबरठ येथील रेल्वेमार्गावर २१ नोव्हेंबरला सकाळी एका महिलेचा मृत्यू झाला. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्याने महिलेची ओळख पटलेली नाही.

विरोधानंतरही दवर्ली, मडगाव येथे रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम चालूच

रेल्वेमार्ग दुपरीकरणाच्या विरोधात राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जात असूनही या विरोधाला डावलून रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम चालू झाले आहे. दवर्ली, मडगाव येथे रेल्वे फाटकाजवळील बांधकाम तोडून या कामाला प्रारंभ झाला आहे.

कोकणात येणार्‍या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडा ! – भाजपचे नेते नीलेश राणे यांची मागणी

गणेशचतुर्थीच्या काळात कोकणात येणार्‍या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात, अशी मागणी माजी खासदार तथा भाजपचे नेते नीलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

१४ एप्रिलपर्यंत मुंबईतील लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस बंद रहाणार ! – रेल्वे प्रशासन

मुंबई शहर आणि उपनगर यांमधील मध्य, पश्‍चिम आणि हार्बर मार्गावर एकही रेल्वे धावणार नसून या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस १४ एप्रिलपर्यंत बंद रहाणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने घोषित केले आहे.