Swapnil Kusale Bronze : स्वप्नील कुसाळे यांनी नेमबाजीत जिंकले कांस्यपदक !

पॅरिस ऑलिंपिक २०२४

स्वप्नील कुसाळे

पॅरिस (फ्रान्स) – येथील ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी ५० मीटर रायफल स्पर्धेत ‘थ्री पोझिशन’मध्ये कांस्यपदक (ब्राँझ) पटकावले आहे. त्यामुळे ते खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे महाराष्ट्राचे दुसरे खेळाडू ठरले आहेत. स्वप्नील हे मूळचे कोल्हापूर येथील आहेत. या ऑलिंपिकमध्ये भारताने आतापर्यंत एकूण ३ पदके जिंकली आहेत. ही तिन्ही कांस्यपदके असून ती नेमबाजीतच मिळाली आहेत.

स्वप्नील कुसाळे यांना रेल्वेमध्ये बढती मिळणार !

मध्य रेल्वेतील पुणे विभागात टीटीई म्हणून कार्यरत असणार्‍या स्वप्नील कुसाळे यांना पदक जिंकल्यामुळे बढती देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी दिली.