|
जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर येथील भोरटेक रेल्वे स्थानकाजवळ भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर (गाडी क्रमांक ०९०७८) हिची ८ वेळा साखळी ओढून धर्मांध मुसलमानांनी रेल्वे थांबवली. त्यानंतर यातून उतरलेल्या शेकडो धर्मांध मुसलमानांनी २० मिनिटे रेल्वेवर दगडफेक केली. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसली, तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी अमळनेर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
Bigots pelt stones at ‘Bhusawal-Nandurbar Passenger’ train for 20 minutes in Amalner
Fanatic Mu$l!ms stopped the train 8 times by pulling the chain – Railway Police delayed filing the report
Those claiming that ‘Mu$l!ms in the country are scared’, where have they hidden now?… pic.twitter.com/sHLaBFj6wC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 13, 2024
१२ जुलै या दिवशी अमळनेर तालुक्यातील धारच्या टेकडीवरील दर्गा येथे उरूस चालू असल्याने तेथे सहस्रोंच्या संख्येने मुसलमानांची गर्दी झाली होती. भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी रेल्वे अमळनेर रेल्वेस्थानकावरून सकाळी १०.५२ वाजता सुटली. या रेल्वेमध्ये सहस्रो प्रवासी बसले होते. सकाळी १०.५५ मिनिटांनी भोरटेक रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे येताच काही धर्मांधांनी साखळी ओढली. या रेल्वेला येथे थांबा नाही, तरीही ही रेल्वेला २० मिनिटे तेथे थांबावे लागले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एकाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी जाईपर्यंत धर्मांध मुसलमानांनी तेथून पळ काढला. तसेच पॅसेंजर रेल्वेही पुढे रवाना झाली. या घटनेत कुणीही घायाळ झाले नसले, तरी या घटनेचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. व्हिडिओमध्ये शेकडोंच्या संख्येने धर्मांध दिसत आहेत. या वेळी रेल्वेतील प्रवासी भीतीपोटी आरडाओरड करत आहेत. एक महिला अन्य प्रवाशांना खिडक्या लावण्यास सांगत आहे.
धर्मांधांनी नाही, तर प्रवाशांनी दगडफेक केल्याची वृत्तवाहिन्यांची माहिती चुकीची !याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, ‘‘धार येथील टेकडीवरील दर्गा येथे प्रतिवर्षी उरूस असतो. तेथे जाण्यासाठी रेल्वेतून प्रवास करणारे मुसलमान प्रतिवर्षी भोरटेक रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची साखळी ओढून भुसावळ-नंदूरबार पॅसेंजर आणि नंतर इतर येणार्या एक्सप्रेस थांबवतात. या वर्षी त्यांनी रेल्वेवर दगडफेक केली. ही रेल्वे गेल्यावर दुपारी १२ वाजता त्याच मार्गावरून जाणारी छपरा-सूरत मार्गावरील तापीगंगा एक्सप्रेस रेल्वेही त्यांनी साखळी ओढून थांबवली. रेल्वेला विलंब होत असल्याने प्रवाशांना मन:स्ताप होऊन ‘प्रवाशांनी दगडफेक केली’ अशी वृत्तवाहिन्या आणि दैनिके यांनी दिलेली बातमी पूर्णपणे चुकीची आहे. प्रत्यक्षात साखळी ओढून रेल्वे थांबवून धर्मांधांनीच रेल्वेवर दगडफेक केली आहे.’’ |
पोलिसांकडून २४ घंटे विलंबाने गुन्ह्याची नोंद !अनेकदा भुसावळ-नंदूरबार पॅसेंजर रेल्वे आणि इतर एक्सप्रेस गाड्या साखळी ओढून थांबवण्याचे प्रकार धर्मांधांकडून झाले आहेत. आतापर्यंत तक्रार न झाल्याने रेल्वे पोलीस दलाकडून गुन्हा नोंद झालेला नाही. या घटनेला २४ घंटे उलटल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. घटना घडल्यानंतर गुन्हा नोंद करून त्वरित चौकशी केली असती, तर गुन्हेगारांना पकडता आले असते, अशी चर्चा सर्वत्र चालू आहे. |
संपादकीय भूमिका
|