मुंबई-रतलाम दरम्यान ‘कवच’ रेल्वे सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

मुंबई – विरार-नागदादरम्यान १४३ कि.मी.वर, तसेच मुंबई ते रतलाम दरम्यान ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. रेल्वेगाड्यांची समोरासमोर होणारी टक्कर टाळण्यासाठी स्वदेशी बनावटीची ‘कवच’ यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. इंजिनच्या ‘लोको पायलट’ने सिग्नल ओलांडल्यास किंवा अतीवेगाने गाडी चालवल्यास या यंत्रणेमुळे रेल्वेगाड्यांचे ब्रेक स्वयंचलितरित्या कार्यान्वित होतात. त्यामुळे अपघात टाळणे शक्य होणार आहे. पश्चिम रेल्वेने २०२२ मध्ये ९० रेल्वे इंजिनसह ७३५ कि.मी.वर ‘कवच’ यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. ९० पैकी एकूण ३४ रेल्वे इंजिनवर ‘कवच’ कार्यान्वित आहे. जून २०२४ पर्यंत ही यंत्रणा चालू होणार आहे.