मुंबई – मुंबई-अयोध्या रेल्वेगाडी चालू व्हावी, अशी इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ३१ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जालना-मुंबई ही ‘वंदे भारत’ रेल्वे आल्यावर त्यांनी तिचे स्वागत केले. त्या वेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे हेही होते. राज्यात रेल्वेने १ लाख ७ सहस्र कोटींची कामे हाती घेतली आहेत. पंतप्रधानांनी एकदा ठरवले की, तो प्रकल्प किंवा कार्यक्रम समयमर्यादेत पूर्ण होतोच, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या वेळी मुख्यमंत्री रेल्वेमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, मिठाई दिली. या रेल्वेमधल्या सोयी-सुविधांविषयी प्रवाशांकडून जाणून घेतले, प्रवाशांचे अनुभव ऐकले.