एमआयएमकडून संभल (उत्तरप्रदेश) शहराचा उल्लेख ‘गाझीं’ची (इस्लामी धर्मयोद्ध्यांची) भूमी’ !

भाजप आणि संत यांच्याकडून विरोध

मोगलांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारा एम्आयएम् पक्ष ! अशा पक्षावर बंदी घालण्याचीच मागणी हिंदूंनी केली पाहिजे ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यातील संभल येथे एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दौर्‍याच्या वेळी लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकांवर ‘गाझींच्या (इस्लामी धर्मयोद्ध्यांच्या) भूमीमध्ये स्वागत आहे’, असे लिहिण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. ही भित्तीपत्रके एम्आयएम्चा नेता मुशीर खान तरीन याने लावली होती. भाजप आणि राज्यातील संत यांनी याचा विरोध केला आहे.

‘गाझी’ म्हणजे काय ?

इस्लाममध्ये गाझी म्हणजे धर्मयोद्धा ! जे स्वतःच्या धर्माची स्थापना करण्यासाठी लढले आणि ज्यांनी अन्य धर्मियांचे धर्मांतर केले, ते धर्मयोद्धे होय. संभलमध्ये पृथ्वीराज चौहान आणि महंमद गझनी याचा पुतण्या सैय्यद सालार मसूद गझनी यांच्यात दोन युद्धे झाली. यांतील पहिले युद्ध पृथ्वीराज चौहान यांनी जिंकले, तर दुसरे ते हरले. तेव्हापासून येथे मोगलांचे राज्य होते.

भगवान कल्कि याचा अवतार संभलमध्ये होणार !

भगवान श्रीविष्णूचा १० वा असणारा कल्कि अवतार संभलमध्ये जन्म घेणार असल्याचे पुराणांमध्ये म्हटले आहे. तो ब्राह्मण कुळातील असणार आहे. शिखांचे १० वे गुरु श्री गुरुगोविंद सिंह यांच्या ‘दशम्’ ग्रंथामध्येही याचा उल्लेख आहे.