कर्नाटकातील नीलहळ्ळी गावात गावकर्‍यांचे फूस लावून धर्मांतर करणार्‍या ४ ख्रिस्ती धर्मप्रसारकांना अटक !

  • ख्रिस्ती धर्मप्रसारक भारतभर मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करत असतांना केंद्र सरकार धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी पावले का उचलत नाही ? – संपादक
  • धर्मांतर हे राष्ट्रांतर असल्याने ‘धर्मांतरा’ची समस्या ही राष्ट्रीय समस्या घोषित करून अशा ख्रिस्ती धर्मप्रसारकांना कठोर शिक्षा केली, तरच त्यांच्यावर वचक बसेल ! – संपादक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

यादगिरी (कर्नाटक) – तालुक्यातील नीलहळ्ळी गावात काहीजण गावकर्‍यांना फूस लावून त्यांचे धर्मांतर करीत असल्याचे लक्षात येताच स्थानिक युवकांनी त्याला विरोध केला. गावातील युवकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर ४ ख्रिस्ती धर्मप्रसारकांना अटक करण्यात आली. यांमध्ये २ महिलांचा समावेश आहे. धर्मांतर करण्यासाठी आलेल्यांपैकी जेमसा नामक एकाने स्थानिक युवकांशी हुज्जत घातली आणि धर्मांतर करण्यासाठी सरकारी आदेश असल्याचे सांगितले. (धादांत खोटे बोलणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक ! राज्यातील भाजप सरकारने धर्मांतराविषयी भूमिका स्पष्ट करून असा सरकारविरोधी प्रसार करणार्‍यांना कारागृहात डांबणे आवश्यक ! – संपादक)

गावातील ग्रामस्थ आणि त्यातही दलितांचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती धर्मप्रसारक प्रयत्न करत होते. ‘गावात चर्च नसतांना लोकांचे धर्मांतर का करत आहात ?’, असे  स्थानिक युवकांनी जेमसा यास विचारल्यावर ‘आम्ही दलितांचे धर्मांतर करत नसून हे त्यांचे ‘परिवर्तन’ करत आहे’, असे सांगितले. (असे शाब्दिक खेळ करून स्वतःचे कुकृत्य झाकू पहाणारे कावेबाज ख्रिस्ती धर्मप्रसारक ! – संपादक) युवकांनी जेमसा याच्याकडे धर्मांतर करण्यास अनुमती देणार्‍या सरकारी आदेशाची प्रत मागितल्यावर जेमसा याने ती न दाखविता ‘पोलिसात जाणार’, असे धमकावले. तेव्हा स्थानिक युवकांनी तात्काळ पोलिस ठाण्यात जाऊन ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या विरोधात  तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी धर्मांतर करण्यासाठी आलेल्या चौघांना अटक केली. ख्रिस्ती धर्मप्रसारकांना न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.