|
बहुतांश हिंदू हे धर्माभिमानशून्य असल्यामुळे त्यांच्या श्रद्धास्थानांची आणि सणांची अशा प्रकारे अवहेलना होत असतांनाही ते निष्क्रीय रहातात. याविरोधात केंद्रातील आणि सर्व राज्यांतील सरकारांनी स्वतःहून कारवाई करत हिंदूंच्या धार्मिक भावनांचे रक्षण केले पाहिजे. हिंदु राष्ट्रात अशा प्रकारची अवहेलना करण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही, असा कायदा आणि वचक असेल ! – संपादक
नवी देहली – ‘नायका’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्या आस्थापनाने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गर्भनिरोधक विकण्यासाठी ४० टक्के सवलत देण्याची योजना घोषित केली आहे. याला सामाजिक माध्यमांतून विरोध होत आहे.
Online store Nykaa advertises condoms for Navratri, insults Hindu sentiments, sparks outrage: Detailshttps://t.co/Uxkdo3fyXp
— OpIndia.com (@OpIndia_com) October 9, 2021
१. ट्विटरवर एका वापरकर्त्याने ट्वीट करून म्हटले आहे, ‘मी ‘नायका’चे अॅप डिलीट करणार आहे. ‘नायका’ने रमझान, ईद, गुड फ्रायडे, ख्रिसमस आदी सणांच्या वेळीही अशी सवलत दिली पाहिजे. प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांच्या वेळीच अशा सवलती कशा दिल्या जातात ?
२. संतोष नावाच्या एका वापरकर्त्याने ट्वीट केले की, ‘नायका’वर संपूर्ण बहिष्कार घातला पाहिजे. अतीस्वातंत्र्य अधिक धोकादायक असते. याविरोधात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
३. एका वापरकर्त्याने म्हटले, ‘नायका’ किंवा अन्य आस्थापन यांना ठाऊक आहे की, हिंदूंच्या सणांना आणि त्यांच्या देवतांचा अवमान करता येऊ शकतो; कारण तसे केले, तरी हिंदू या आस्थापनांची उत्पादने विकत घेतात. (ही मानसिकता हिंदूंना लज्जास्पद ! अशांचे हिंदूंचे देवतांनी आपत्काळात तरी का रक्षण करावे ? – संपादक)