बागपत (उत्तरप्रदेश) येथील एका गावामध्ये गायींच्या शरिरावर ‘७८६’ लिहिल्याने तणाव !

इस्लाममध्ये ७८६ हा आकडा पवित्र मानला जातो. मुसलमान अल्लाच्या नावाच्या जागी ‘७८६’ हा आकडा लिहितात.

हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपर्वक भडकावण्यासाठी धर्मांधांकडून अशी कृत्ये केली जात आहेत. याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? – संपादक

बागपत (उत्तरप्रदेश) – येथील अंगदपूर-जहौरी गावामध्ये गायींवर ‘७८६’ हा आकडा लिहिण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने येथे तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, काही धर्मांधांनी २-३ बेवारस गायींना पकडून त्यांच्यावर मेहंदीद्वारे ‘७८६’ आकडा लिहून त्यांना सोडून दिले.

या घटनेमुळे हिंदूंमध्ये संताप निर्माण झाला. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक असे कृत्य केल्याचा आरोप हिंदूंनी केला. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, गायींच्या शरिरावर लिहिलेले हे आकडे आता पुसून टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी अद्याप कुणावरीही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही; मात्र संबंधितांचा शोध घेण्यात येत आहे.