‘सीएट टायर’च्या विज्ञापनातून अभिनेते आमीर खान यांचा रस्त्यांवर फटाके न फोडण्याचा संदेश !

सामाजिक माध्यमांतून आमीर खान यांच्यावर टीका; ‘रस्त्यांवर नमाजपठण कसे करता येते ?’ असा प्रश्‍न !

सातत्याने हिंदूंच्या सणांच्या वेळीच असे सल्ले कसे दिले जातात ? नाताळच्या वेळीही ख्रिस्त्यांकडून रस्त्यांवर फटाके फोडले जातात, तेव्हा कुणीच का बोलत नाही ? बकरी ईदला रस्त्यावर गोहत्या केली जाते, बकर्‍याची हत्या केली जाते, तेव्हा लोक विरोध का करत नाहीत ? – संपादक

मुंबई – अभिनेते आमीर खान यांनी केलेले ‘सीएट टायर’चे एक विज्ञापन प्रसारित होत आहे. यात आमीर खान एका मुलाला म्हणतात, ‘अनार, सुतळी बाँब आणि भुईचक्र हे सर्व फटाके आपला संघ जिंकला, तर नक्की फोडणार आहोत; परंतु ते रस्त्यांवर नाही. कारण रस्ते हे फटाके फोडण्यासाठी नाही, तर गाड्या चालवण्यासाठी आहेत. त्यामुळे आपल्याला फटाके फोडायचे आहेतच; परंतु ते सोसायटीच्या आवारात, रस्त्यांवर नाही.’ हे विज्ञापन प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होऊ लागली आहे. ‘रस्ते हे नमाजपठण करण्यासाठी आहेत का ?’, असे प्रश्‍न विचारत आमीर खान यांना ‘हिंदुविरोधी’ असल्याचे म्हटले जात आहे. तसेच आमीर खान आणि सीएट टायर यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

१. सामाजिक माध्यमांवर एका व्यक्तीने लिहिले आहे की, हिंदी चित्रपटसृष्टीतील लोक हिंदूंच्या सणांना नेहमीच लक्ष्य करतात, तरीही हिंदू त्यांचे चित्रपट पहातात.

२. ‘सीएट टायर’चे मालक हर्ष गोयंका यांच्यावरही अनेकांनी टीका केली आहे. त्यांना ‘हिंदूफोबिक’ (हिंदुविरोधी) असे म्हटले आहे.

३. एकाने लिहिले की, मी तर आता माझ्या चारचाकी गाडीचे सीएट टायर पालटून दुसर्‍या आस्थापनाचे टायर लावणार आहे. इतकेच नाही, तर इतर लोकांनाही तसे करण्यास सांगणार आहे.