विश्रामबाग येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर शाळेत उन्‍हाळी शिबिराचे आयोजन !

विश्रामबाग येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर शाळा

सांगली – विश्रामबाग येथील स्‍वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्‍ठान प्रशाला आणि ‘शोतोकॉन कराटे-दो फेडरेशन ऑफ महाराष्‍ट्र’ या संस्‍थेच्‍या वतीने १ ते ११ मे असे १० दिवस उन्‍हाळी व्‍यक्‍तिमत्त्व शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे शिबिर प्रतिदिन सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत पार पडेल.

या शिबिरामध्‍ये कराटे, बॉक्‍सिंग, लाठी-काठी, स्‍केटिंग, घोडेस्‍वारी, पोहणे अशा विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. खेळाडूंना प्रतिदिन अल्‍पाहार आणि भोजन दिले जाईल. या शिबिरामध्‍ये ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. हे शिबिर संस्‍थेचे अध्‍यक्ष मधुकर पगडे आणि सुनीता पगडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली होणार आहे. तरी याचा अधिकाधिक विद्यार्थ्‍यांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन प्रज्ञा प्रबोधिनीचे मुख्‍याध्‍यापक सुबोध कुलकर्णी, अभिनव शाळेचे मुख्‍याध्‍यापक महादेव कुंभार, स्‍वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्‍ठान प्रशालेचे अध्‍यक्ष विजयकुमार नामजोशी यांनी केले आहे.