पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमोर उपस्थित केला हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचा विषय !

अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

अर्थसंकल्पाविषयी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया…

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सिद्ध केलेला अर्थसंकल्प ! – अजित पवार

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्‍या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !

शिगमोत्सवातील सादरीकरणासाठी समयमर्यादेत वाढ करा ! – शिगमोत्सव समित्यांची गोवा सरकारकडे मागणी

राज्य सरकारने शिगमोत्सव साजरा करण्यासाठी रात्री १० पर्यंत समयमर्यादा घातली आहे. या वेळेत रोमटामेळ आणि चित्ररथ यांचे सादरीकरण होऊच शकत नसल्याने सरकारने ही वेळ वाढवून ती रात्री १२ वाजेपर्यंत करावी – पत्रकार परिषदेतील मागणी

सिंधुदुर्ग : तिलारी खोर्‍यातील हत्ती हटवा, अन्यथा त्यांना गोळ्या घालण्याची अनुमती द्या !

हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन आतंकवाद्यांकडून जनतेचे रक्षण काय करणार ?

‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची माहिती देण्यासाठी पुणे येथे पत्रकार परिषद पार पडली !

हिंदु जनजागृती समिती, खडकवासला येथील ग्रामस्‍थ आणि अन्‍य समविचारी संघटना यांच्‍या संयुक्त विद्यमाने गेली २० वर्षे ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीम राबवली जात आहे.

पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी साजरी करा ! – पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल

ज्ञानप्रसारक मंडळाच्या संशोधन केंद्राने, गोवा सरकारचे पर्यावरण खाते, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ अन् गोवा राज्य जैवविविधता मंडळ यांनी आगामी होळीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग सिद्ध करून तो बाजारात उपलब्ध केला आहे.

मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’साठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार ! – किशोर घाटगे

मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चासाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांनी दिली.

मुंबईतील पत्रकार परिषदेतील मान्‍यवरांचे विचार !

राज्‍यातील ३५ महत्त्वाच्‍या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे त्‍वरित हटवा ! – श्री. सुनील घनवट

पुन्‍हा अन्‍वेषण करून ३ मासांत दोषारोपपत्र प्रविष्‍ट करण्‍याचे सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निर्देश

करमुसे यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने जीतेंद्र आव्‍हाड यांना फटकारले असून या प्रकरणाचे पुन्‍हा अन्‍वेषण करण्‍याची करमुसे यांची मागणी मान्‍य केली आहे.