सोलापूरमधील गोवंश हत्येविषयी होणार उच्चस्तरीय चौकशी !

‘सोलापूर एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या पशूवधगृहाने बांधकामाची अनुमती घेतली आहे का ? प्रदूषण नियंत्रणाविषयीचे नियम पाळले जात आहेत का ? तसेच गोवंशांची हत्या होत आहे का ? याविषयी उच्चस्तरीय चौकशी करून १ मासात अहवाल सादर केला जाईल.

जगातील सर्वांत प्रदूषित देशांमध्ये भारत ५ व्या क्रमांकावर !

विदेशी आस्थापनांनी सिद्ध केलेले अशा प्रकारचे अहवाल किती खरे असतात, याचाही आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. पाश्‍चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, हे जगजाहीर असतांना विकसनशील देशांना प्रदूषणासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे !

विश्वविघातक प्रदूषण रोखा !

प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराचा सामना करण्याचे मोठे शस्त्र हिंदु धर्मातील ऋषिमुनींनी ‘अग्निहोत्रा’च्या माध्यमातून आपल्याला आधीच उपलब्ध करून दिले आहे. अग्निहोत्रातून उत्पन्न झालेल्या धुराने वायूचे शुद्धीकरण होऊन हानीकारक विषाणूंचा नाश होतो. त्याचा अवलंब वैश्विक स्तरावर होण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रयत्न करावेत.

कृष्णेतील प्रदूषणास साखर कारखाने, नगरपरिषदा, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकाच उत्तरदायी ! – राष्ट्रीय हरित लवाद

राष्ट्रीय हरित लवादाने साखर कारखाने, नगरपरिषदा, तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका प्रदूषणाला उत्तरदायी आहे, असे सांगितले आहे.

पंचगंगा नदीप्रदूषण प्रकरणी महापालिकेला प्रदूषण मंडळाची नोटीस !

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, कॉमन मॅन या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी जयंती नाल्यासह ६ नाल्यांमधील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि त्या संदर्भात तक्रारी केल्या.

कल्याण येथील वालधुनी नदीत रासायनिक द्रव्य सोडणारा मुसलमान पोलिसांच्या कह्यात

कल्याण येथील वालधुनी नदीपात्रात रासायनिक द्रव्य सोडणारा टँकरचालक नजीर मोहम्मद शमीउल्ला अन्सारी याला पोलिसांनी कह्यात घेतले आणि टँकर जप्त केला आहे. रासायनिक द्रव्ये असलेला टँकर रात्री २ वाजता नदीपात्रात रिता केला जात असल्याची माहिती पर्यावरणप्रेमींना मिळाली. 

जागतिक हवामान पालट परिषदेचा फार्स !

जागतिक हवामान पालट आणि त्यातून निर्माण होणार्‍या समस्यांवर शाश्वत उपाय म्हणजे हिंदु धर्म-संस्कृती यांचे पालन ! जगाच्या दृष्टीने विचार केल्यास जर जागतिक स्तरावर पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल, तर हिंदु धर्मातील तत्त्वांचे आचरण करण्याकडेच आपल्याला वळावे लागेल !

वाढते प्रदूषण एक चिंतेचा विषय !

‘देहली येथील वायूप्रदूषणामुळे एका नवीन चर्चेला आरंभ झाला आहे; परंतु प्रदूषण केवळ राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातच (NCR) आहे, असे नाही; उलट संपूर्ण जगाला ती एक मोठी समस्या भेडसावत आहे आणि जगभरातील सर्व प्राणीमात्रांंवर त्याचा दुष्परिणाम जाणवत आहे.

देेहलीत वायूप्रदूषणाचा हाहा:कार !

शाळांना सूचित करण्यात आले आहे की, जर शक्य असेल, तर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्गही ऑनलाइन घेतले जावेत. याखेरीज वर्गाबाहेरील प्रार्थना, मैदानी खेळ आदींसारख्या कार्यक्रमांवर पूर्णपणे निर्बंध आणण्यात आले आहेत.