कल्याण येथील वालधुनी नदीत रासायनिक द्रव्य सोडणारा मुसलमान पोलिसांच्या कह्यात

पोलिसांनी जप्त केलेले टँकर

ठाणे, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – कल्याण येथील वालधुनी नदीपात्रात रासायनिक द्रव्य सोडणारा टँकरचालक नजीर मोहम्मद शमीउल्ला अन्सारी याला पोलिसांनी कह्यात घेतले आणि टँकर जप्त केला आहे. रासायनिक द्रव्ये असलेला टँकर रात्री २ वाजता नदीपात्रात रिता केला जात असल्याची माहिती पर्यावरणप्रेमींना मिळाली. त्यांनी टँकरचालकास मज्जाव करून पोलिसांच्या कह्यात दिले. (जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणारे पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संघटना यांचे अभिनंदन ! जी माहिती नागरिकांना मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? – संपादक)