पंचगंगा नदीप्रदूषण प्रकरणी महापालिकेला प्रदूषण मंडळाची नोटीस !

कोल्हापूर – प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, कॉमन मॅन या संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी जयंती नाल्यासह ६ नाल्यांमधील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि त्या संदर्भात तक्रारी केल्या. मोरेवाडी, पाचगाव, कळंबा या गावांतील विनाप्रक्रिया सांडपाणी जयंती नाल्यातून थेट पंचगंगेत मिसळत आहे. जयंती नाला बंधारा येथे सांडपाणी आल्यावर उपसा यंत्रणा अल्प पडत असल्याने हे सांडपाणी थेट पंचगंगेत जात आहे. यानंतर प्रदूषण मंडळाने महापलिकेचे पर्यावरण अभियंता आणि जलअभियंता यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली आहे. यात ‘७ दिवसांत नदीत मिसळणारे सांडपाणी रोखा; अन्यथा कायदेशीर कारवाई का करू नये, याचा खुलासा करावा’, असे नमूद करण्यात आले आहे.