देशभरात एकूण ३११ नदीपट्ट्यांमध्‍ये धोकादायक प्रदूषण !

देशभरातील ३११ नद्यांतील काही पट्ट्यांमध्‍ये प्रदूषण हे धोक्‍याच्‍या पातळीवर असल्‍याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्रातील ५५ नद्यांचा समावेश आहे. यामध्‍ये वाशिष्‍ठी, सावित्री आणि मुचकुंदी हे जिल्‍ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित असल्‍याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या (सीपीसीबी) अहवालातून स्‍पष्‍ट झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित !

देशभरातील ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील ५५ नदीपट्ट्यांचा समावेश आहे. यात रत्नागिरीतील ३ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून पुढे आले आहे.

पणजी हे गोव्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर

देशातील ३८९ प्रदूषित शहरांच्या सूचीमध्ये पणजी शहराचा २३० वा क्रमांक लागतो. ‘पी.एम्.१०’चे प्रमाण ३१९ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असलेले हरियाणामधील सोनेपत शहर हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

केंद्रशासनाच्या अहवालानुसार ३११ प्रदूषित नद्यांच्या सूचीमध्ये गोव्यातील ६ नद्या

श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याची आवई उठवणारे तथाकथित पर्यावरणवादी उद्योग आणि कारखाने यांच्याकडून टाकाऊ पदार्थ नद्यांमध्ये सोडले जात असतांना गप्प का ?

नद्यांचे प्रदूषण ?

नद्यांमध्‍ये असलेल्‍या गाळामुळे त्‍यांची वहन, साठवण क्षमता न्‍यून होणे, असे गंभीर दुष्‍परिणाम होत असल्‍याचे दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नदीच्‍या समस्‍यांचा अभ्‍यास करून त्‍या सोडवण्‍यासाठी ‘चला जाणूया नदीला’, या अभियानाला प्रारंभ करण्‍यात आला आहे.

शुद्ध हवा कधी मिळणार ?

प्रशासनाने इच्‍छाशक्‍ती वाढवून शहरातील प्रदूषण वाढण्‍यामागील नेमकी कारणे शोधून त्‍यावर कार्यवाही करणे, प्रदूषकांच्‍या स्रोतांवर काम करणे अशा उपाययोजना युद्धस्‍तरावर केल्‍या, तर हवेची  गुणवत्ता सुधारणे अशक्‍य नाही !

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांना जलप्रदूषणाविषयी राष्‍ट्रीय हरित प्राधिकरणाची नोटीस

जिल्‍ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांच्‍याकडून कोणतीही प्रक्रिया न करता प्रतिदिन लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी समुद्र आणि नद्या यांमध्‍ये सोडले जात आहे.

प्रदूषणाच्या नावाखाली केवळ हिंदूंवर होणारी एकमार्गी कारवाई थांबवावी !

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केवळ हिंदूंच्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सणांच्या वेळी एकमार्गी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकशाहीमध्ये भारतीय राज्यघटनेनुसार कारभार करतांना सर्व धर्मांना समान वागणून मिळणे अपेक्षित असतांना प्रदूषण मंडळाकडून होत असलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

वर्ष २०२२ मध्ये २८० दिवस मुंबईतील हवा अधिक प्रदूषित !

वर्ष २०२२ मध्ये ३६५ दिवसांपैकी २८० दिवस मुंबईतील हवा प्रदूषित झाली होती. वर्षभरात हवेची गुणवत्ता खाली आल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी मांडला आहे.

आपत्काळातून वाचण्यासाठी पाश्चात्त्यांची खुजी धडपड !

सर्व काही नष्ट होईल, तर आपण कसे जगायचे ? आणि दुसरे सर्व नष्ट झाले, तर आपण कसे वाचायचे ? ही धडपड अर्थात्च अतीश्रीमंत किंवा महाश्रीमंत यांची आहे.