अजित पवार मुख्‍यमंत्री होणार असल्‍याच्‍या अफवा यशस्‍वी होणार नाहीत ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

जितदादा सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍यानंतर ते मुख्‍यमंत्री होणार आहेत, असे कोण पिकवत आहे, त्‍यांचे मनसुबे यशस्‍वी होणार नाहीत, असे मत राज्‍याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्‍यास शिवसेनेच्‍या आमदारांचा विरोध !

शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांसह भाजपच्‍या ६ आमदारांनी अदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद देण्‍यास विरोध दर्शवला आहे.

वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून ठाकरे गटाला १५ दिवसांत भूमिका सांगण्‍याचे आवाहन !

प्रकाश आंबेडकर एम्.आय.एम्.शी युती करणार असल्‍याचीही चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर त्‍यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

मराठवाड्यातील राष्‍ट्रवादीच्‍या ११ पैकी ७ आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा !

राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्‍या गटबाजीनंतर आता २ गट आमने-सामने पहायला मिळत आहेत. त्‍यामुळे आमदारांची जमवाजमव दोन्‍ही गटांकडून करण्‍यात येत आहे.

वर्ष २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्‍यमंत्री ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्‍यक्ष, भाजप

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हेच वर्ष २०२४ पर्यंत मुख्‍यमंत्री रहाणार आहेत, असे स्‍पष्‍ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे ६ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केले. ‘उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी केलेल्‍या विधानावर विश्‍वास ठेवला पाहिजे.

बंगालमधील आय.एस्.एफ्.चा आमदार नौशाद सिद्दिकी याच्यावर बलात्काराचा आरोप

पीडित महिलेने तिच्या भावाच्या साहाय्याने न्यू टाऊन पोलीस ठाण्यात सिद्दिकीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले. नुसते अन्वेषण करून न थांबता आरोपीला तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे !

मी त्यागपत्र देणार ही अफवा ! – मुख्यमंत्री

मी त्यागपत्र देणार आहे, ही अफवा आहे. विरोधकांकडून ती पसरवली जात आहे. सर्वसामान्य घरातील माणूस मुख्यमंत्री झाला, ही विरोधकांची पोटदुखी आहे. सरकारच्या शपथविधीपासून ते ‘सरकार पडेल’ असे म्हणत आहेत.

(म्‍हणे) ‘राष्‍ट्रप्रेमी नसलेल्‍यांसमवेत जाणार नाही !’ – शरद पवार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

दंगल घडवून राजकीय लाभ घेण्‍याचा भाजपचा प्रयत्न आहे. राष्‍ट्रीय ऐक्‍याला तडा देणारे राष्‍ट्रप्रेमी असू शकत नाहीत. राष्‍ट्रप्रेमी नाहीत, त्‍यांच्‍यासमवेत जाणार नाही, अशी भूमिका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवार यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या बैठकीत घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती !

राष्ट्रवादी काँग्रेस’ नाव आणि पक्षाचे चिन्ह ‘घड्याळ’ यांसाठी दावा करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहे. या पत्रावर ३० जून हा दिनांक असून हे पत्र ५ जुलै या दिवशी निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहे.

तुम्ही शतायुषी व्हा; पण या वयात राजकारणात थांबणार आहात कि नाही  ? – अजित पवार

राज्यात शासकीय नोकरीमध्ये वयाच्या ५८ व्या वर्षानंतर, तर केंद्रशासनाच्या नोकरीतून ६० वर्षांनी निवृत्त व्हावे लागते. भाजपमध्ये ७५ वर्षांच्या नेत्यांना निवृत्ती घ्यावी लागते. मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी हे नेते याची उदाहरणे आहेत.