Congress Avoids Political Damage : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून राज्यात २२ जानेवारीला ३४ सहस्र मंदिरांमध्ये विशेष पूजा करण्याचा आदेश !

रामालिंगा रेड्डी

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील ३४ सहस्र मंदिरांमध्ये २२ जानेवारीला विशेष पूजा आयोजित करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस सरकारचे मंत्री रामालिंगा रेड्डी यांनी दिली.

या निर्णयावर भाजपचे नेते सी.टी. रवि म्हणाले की, हा कर्नाटक सरकारचा चांगला निर्णय आहे. आम्ही त्यासाठी धन्यवाद देतो. काँग्रेसला अनेक वर्षांनंतर सद्बुद्धी झाली आहे. काँग्रेसने भगवान श्रीरामाला सोडून दिले होते; पण आता ती पुन्हा त्याच्याकडे जात आहे.

संपादकीय भूमिका 

आतापर्यंत श्रीरामाला काल्पनिक म्हणणार्‍या काँग्रेसला झालेली ही सद्बुद्धी नसून राजकीय हानी होण्यापासून वाचण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे !