Siddaramaiah On Ram Mandir : (म्हणे) ‘काँग्रेस म. गांधी यांच्या रामाची पूजा करते, तर भाजप रामाला सीता-लक्ष्मणापासून दूर नेतो !’ – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दावा !

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – मी माझ्या गावात श्रीरामचंद्र मंदिर बांधले. हे राजकीय कारणास्तव केलेले नाही. अयोध्येतील श्रीरामचंद्र हे संपूर्ण भारतातील गावांमध्ये असलेल्या श्रीरामचंद्रांपेक्षा वेगळे आहेत का ? भाजप प्रभु श्रीरामाचे राजकारण करत आहे. काँग्रेस म. गांधी यांच्या रामाची पूजा करते, तर भाजपवाले प्रभु श्रीरामाला सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्यापासून दूर नेत आहे, असा दावा कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका श्रीराममंदिराचे लोकार्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना केला.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, रामावर राजकारण होता कामा नये; कारण श्रीरामचंद्र सर्वांचे आहेत. ते केवळ भाजपचे नाहीत.आम्हीही श्रीरामभक्त आहोत. ‘आम्ही श्रीरामाच्या विरोधात आहोत’, असे चित्र दाखवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे; पण हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. कालांतराने अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • ‘म. गांधी यांचा राम म्हणजे काय ?’, हे आधी काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे ! कारण हिंदूंचा ‘राम’ रावणासह असंख्य असुरांचा वध करून जनतेचे रक्षण करणारा आहे !
  • काँग्रेस खरेच श्रीरामाची पूजा करत असती, तर स्वातंत्र्यानंतर लगेचच अयोध्येत काँग्रेसने आतासारखे भव्य मंदिर बांधले असते; मात्र काँग्रेसवाल्यांनी श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू पाडण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पूर्वीपासून टिपू सुलतान, औरंगजेब, बाबर, अकबर यांचाच उदोउदो करते आणि आजही करत आहे !